Pages

हार्दिक स्वागत

http://picasion.com/gl/8bzq/
#### मंगेश वानखडे स. शिक्षक, शाळा हातगाव , पं. स. ,दारव्हा जि. यवतमाळ मो.नं. ९७६४२७३२०९ तर्फे हार्दिक स्वागत ! 🙏🙏💐🙏🙏@@@@ सोबतच माझ्या MANGESH KID-TECH By Mangesh Wankhade या You Tube Channel ला भेट देऊन शाळेचे विविध उपक्रम पहा व Channel subscribe करा ####

Online Updates

*** blog ला भेट देणाऱ्या सर्वांचे हार्दिक आभार!! 🙏🙏 *** ----------------���� Thank you 🙏🙏 ..... Visit again for more information.. 🙏🙏 ���� -------- ..... ....---

Computer चे shortcuts

संगणकाचे १० शॉर्टकट ■

◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
   संगणक वापरताना आपण माऊसचा वापर कमांड देण्यासाठी करत असतो. तर किबोर्ड टायपिंग करण्यासाठी. पण किबोर्डचा वापर फक्त टायपिंगसाठी न करता त्यातील काही शॉर्टकट वापरुन आपण आपला वेळ वाचवू शकतो. याचबरोबर किबोर्डची उपयुक्तता ही वाढते.
•●◎◑◎✹★✹🔅✹★✹◎◑◎●•
■  Alt + Tab

   आपण जर एकाचवेळी अनेक साईट, सॉफ्टवेअर्स वापरत असाल तर या शॉर्टकटचा वापर करुन आपण एका साईट किंवा सॉफ्टवेअरवरुन दुसरे बॅकग्राऊंडला सुरू असणारी साईट किंवा सॉफ्टवेअर उघडू शकता.
•●◎◑◎✹★✹🔅✹★✹◎◑◎●•
■  Ctrl + Shift + Esc

   संगणक हँग झाल्यावर या शॉर्टकटचा वापर करुन आपण टास्क मॅनेजर थेट उघडू शकतो. टास्क मॅनेजरमधून कोणता प्रोग्राम चालत नाही याची माहिती घेऊन तो बंद करु शकतो.
•●◎◑◎✹★✹🔅✹★✹◎◑◎●•
■ Shift + Delete:

   आपणला जर कोणतीही फाईल कायमची डिलीट कराची असेल तर आपण या शॉर्टकटचा वापर करुन ती कायमची डिलीट करु शकतो. ती फाईल रिसायकल बीनमध्ये न जाता थेट डिलीट होते.
•●◎◑◎✹★✹🔅✹★✹◎◑◎●•
■ Windows logo key + L

   या शॉर्टकटद्वारे आपण संगणक लॉक करु शकतो. जेणेकरुन  आपल्या अनुपस्थितीत त्याचा कोणी गैरवापर करणार नाही.
•●◎◑◎✹★✹🔅✹★✹◎◑◎●•
■  Ctrl + F4

    एकाच सॅफ्टवेअरच्या अनेक फाईल ओपन असतील तर त्या बंद करण्यासाठी या शॉर्टकटचा वापर करता येतो. यामूळे  एक एक विंडो बंद करण्याऐवजी एकाचवेळी अनेक विंडो बंद करता येतात.
•●◎◑◎✹★✹🔅✹★✹◎◑◎●•
■  Ctrl + Y

    जसे आपण Ctrl + Z याचा वापर करुन Undo करु शकतो तसेच  Ctrl + Y करुन आपण Redo करू शकतो.
•●◎◑◎✹★✹🔅✹★✹◎◑◎●•
■  Ctrl + Shift with an arrow key

    संगणकावर लिखीत माहिती वाचण्यासाठी या शॉर्टकचा वापर करता येतो. यामुळे पेज सरकवणे सोपे जाते.
•●◎◑◎✹★✹🔅✹★✹◎◑◎●•
■  Windows logo key + D

    या शॉर्टकटचा वापर करुन आपण सगळ्या विंडो एकाचवेळी मिनीमाईज करु शकतो. यामुळे आपला प्रत्येक विंडो मिनीमाईज करण्याचा वेळ वाचतो.
•●◎◑◎✹★✹🔅✹★✹◎◑◎●•
■  Windows logo key + I

   या शॉर्टकटचा वापर करुन आपण थेट संगणकाच्या सेटींगमध्ये जातो. यामुळे संगणकाचे सेटिंग कुठे आहे हे शोधत बसावे लागत नाही.
•●◎◑◎✹★✹🔅✹★✹◎◑◎●•
■  Windows logo key + number:

   जर तुम्ही ॲप पिन करत असाल तर या शॉर्टकटचा वापर करुन तुम्ही ते ॲप लगेच उघडू शकता. जसे तुम्ही कॅलक्युलेटर चौथ्या क्रमांकावर पिन केले असेल तर विंडो + ४ हा शॉर्टकट वापरल्यास ते ॲप लगेच उघडते.
•●◎◑◎✹★✹🔅✹★✹◎◑◎●•